इंदोरी: पाबळ येथील विज्ञान आश्रम येथे इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीसीई)ची एक दिवसीय शैक्षणिक सहल आनंदात झाली. विज्ञान आश्रम पाबळ  ही संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल या संस्थेसी संलग्न आहे.
डिप्लोमा इन बेसिक रुलर टेक्नॉलॉजी म्हणजेच डी.बी.आर.टी या नावाने येथे विद्यार्थ्यांसाठी कोर्सेस चालवले जातात. ज्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान फूड प्रोसेसिंग, कृषी ,इलेक्ट्रिशियन, प्रोग्रामिंग ,रोबोटिक्स, फार्मासिटिकल , प्लंबिंग वेल्डिंग असे कोर्स घेतले जातात.याची अतिशय वेगळी अशी बाजू म्हणजे वय वर्ष १५ पूर्ण असणारे स्कूल ड्राफ्ट आऊट किंवा कॉलेज विद्यार्थी येथे दाखल होऊ शकतात.
बदलत्या काळातील वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने युक्त असा हा अभ्यासक्रम मुलांना अगदी लहान वयात कमी कालावधीमध्ये स्वतःच्या पायावर उभा राहण्यास व उद्योजक होण्यास मदत करतो. या संकल्पनेवर आधारित काही कोर्सेस चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू करण्या विषयीचा विचार सुरू आहे . विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच  औद्योगिक शिक्षण देण्याची गरज आहे.
पाबळ येथे झालेल्या एकदिवसीय शैक्षणिक सहलीमध्ये चैतन्य इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शिक्षकांनी  सहभाग घेतला. संस्थेचे चेअरमन  भगवान शेवकर यांनी आपल्या स्कूलमध्ये  असे अभ्यासक्रम सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा  मानस असून क्लास पाचवी ते दहावीपर्यंत च्या विद्यार्थ्यांना काही निवडक कोर्स नोव्हेंबर पासून सुरू करण्याचे व्यवस्थापनाच्या विचाराधीन असल्याचे सांगितले.
याविषयीची सविस्तर संकल्पना पालकांना सांगण्यात  येऊन सर्वांच्या सहमतीने ही योजना राबविण्यात येईल. या शैक्षणिक एकदिवसीय  सहलीमध्ये स्कूल डेव्हलपमेंट कमिटीचे सदस्य  उबाळे सर,   भारतध्वज  सर, काळोखे सर ,संतोष जी उपस्थित होते.  स्कूलच्या उपप्राचार्य रत्नमाला कापसे यांनी शैक्षणिक सहलीचे उत्तम आयोजन केले.

error: Content is protected !!