तळेगाव दाभाडे: नाणोली तर्फे चाकण येथे श्री.मरिमाता देवी नवरात्र उत्सव व आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात  ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. श्री मरिमाता देवी देवस्थान  गावात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा, संगित खुर्ची, महिलांसाठी लकी ड्रॉ, संगीत खुर्ची स्पर्धा, किल्ले बनवा स्पर्धा अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
यावर्षी  रक्तदान शिबिरासाठी श्री मरिमाता देवी देवस्थानचे कार्यकर्ते अंकुश शिंदे, संकेत जगताप, अनिकेत जगताप, सुरेश शिंदे, रमेश चव्हाण, दिपक शिंदे, विनोद शिंदे, शंकर कोंडे, प्रविण जगताप, सुरज शिंदे, गणेश जगताप, सागर आल्हाट, अजय शिंदे, अभिषेक बोराडे, प्रतिक जगताप, ओंकार बोराडे, सोमनाथ मराठे, शुभम काळे, सार्थक मराठे, ऋतिक जगताप, साईनाथ मोईकर, अभि शिंदे, साईनाथ मराठे, आदिनाथ लोंढे, आर्यन भोसले, दत्ता कोंडे, दत्ता चव्हाण, सुमेध शिंदे, सुनिल शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.
गावातील विलास जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, निलेश मराठे, सागर राजगुरू, विवेक शिंदे, प्रितेश आल्हाट, राहूल शिंदे, वैभव काळे, अक्षय लोंढे, विजय शिंदे, दिनेश मोरे, आकाश मोरे, अक्षय टिळेकर, संगिता जगताप,सरस्वती लोंढे,माया मखामले, पुजा चव्हाण, मानसी बो-हाडे, प्रांजली मखामले, प्रिया लोंढे या रक्तदात्यांनी रक्तदान केले.

error: Content is protected !!