तळेगाव दाभाडे ( प्रतिनिधी  शैलजा फुलकर):जगप्रसिध्दू हुदांई स्टील ही दक्षिण कोरियाची कंपनी तळेगाव दाभाडे औद्योगिक परिसरातील मंगरूळ येथील आरएमके इंडस्ट्रीयल पार्क्समध्ये लवकरच कार्यान्वित होत आहे. त्याचबरोबर एन्व्हीएच इंडिया, पीएचए इंडिया, कोमोस ऑटोमोटिव्ह डुवन ऑटोमोटिव्ह, पॅराकोट प्रॉडक्ट, मुव्हमेंट सिस्टम व लॉजिस्टीक प्युअर ऑल या अन्य 8 कंपन्याही येणार असून आर एम के स्पेसेस व गु्रपने या सर्व कंपन्यांना 70 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.
जागेच्या हस्तांतरणाचा  पुणे येथे  पार पडला. या वेळी आर. एम. के. स्पेसेस व गु्रपचे रामदास काकडे, रणजित काकडे, काकडे कुटुंबीय तसेच हुंदाई व अन्य कंपन्यांचे सीईओ, सीएफओ डायरेक्टर, प्रतिनिधी आदी उपस्थित होते.या सर्व कंपन्या एकुण 2260 कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातून 2640 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
आर एम के स्पेसेस व ग्रुप यांच्या माध्यमातून मंगरूळ, नवलाख उंब्रे, बधलवाडी, करंजविहिरे या परिसरात हे कारखाने उभे राहणार आहेत.येत्या 6 महिन्याच्या काळात त्यांच्या प्रत्यक्ष उत्पादनास प्रांरभ होणार आहे. त्यामुळे भविष्यात नवनवीन उद्योगांना आकर्षित अशा या परिसरात गुंतवणुकीस चालना मिळणार आहे.
हुंदाई स्टील 260 कोटी, संगवू हायटेक 970 कोटी, एन्व्हीएच इंडिया 150 कोटी, पीएचए इंडिया 100 कोटी, कोमोस ऑटोमोटिव्ह 200 कोटी, डुवन ऑटोमोटिव्ह 100 कोटींची गुंतवणूक करणार आहे.मावळ तालुक्यात तळेगाव एमआयडीसी मध्ये मंगरूळ, आंबी, बधलवाडी, मिंडेवाडी, जाधववाडी, नवलाख उंब्रे, आंबळे, करंजविहिरे  या ठिकाणी मोठया कंपन्या कार्यरत आहेत.
तळेगाव एमआयडीसी बरोबरच या भागामध्ये आर.एम. के. स्पेसेसचे रणजित काकडे व सहकारी यांच्या प्रयत्नातून आजपर्यंत 24 कंपन्यांनी या भागामध्ये 4000 कोटी रूपयांची गुंतवणूक करून 6000 जणांना रोजगार निर्माण केला आहे.आर. एम. के स्पेसेसचे रणजित काकडे व सहकारी यांचे प्रयत्नातून मंगरूळ येथे 6, बधलवाडी येथे 1, नवलाख उंब्रे येथे 1, करंजविहिरे येथे 1 अशा 9 कंपन्या नवीन येत आहे. त्यामध्ये एकुण 2260 कोटी रूपयांची गुंतवणूक होत आहे. एकुण अंदाजे 2700 लोकांना रोजगार निर्माण होणार आहे.
जमीन अकृषिक करणे, जमीन सपाटीकरण, 24 तास वीज आणि पाणी, उत्तम रस्ते या सर्व सुविधा आर एम के स्पेसेस उपलब्ध करून देणार आहे.  या कंपन्यांच्या प्रकल्पाची उभारणी चालू झाली असून, मंगरूळ, आंबी, बधलवाडी, जाधववाडी, नवलाख उंब्रे, आंबळे, करंजविहिरे गावातील ग्रामस्थांनी या कंपन्यांना उत्तम सहकार्य केले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरूपा कानेटकर यांनी केले. व आभार प्रदर्शन नितीश कामदार यांनी केले.

error: Content is protected !!