इंदोरी: येथील चैतन्य इंटरनॅशनल सीबीएसई (इंदोरी) स्कूलला जपानी आस्थापनच्या कमिटीने  सदिच्छाभेट दिली.या   कमिटी मध्ये पंधरा सदस्य होते.युकिनोरी हरादा,अत्सुको इशिकावा आणि त्यांच्या इतर सदस्यांचा समावेश होता . आलेल्या पाहुण्यांनी स्कूलची असेंबली, प्रार्थना  आणि श्री गणेश आरतीमध्ये सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी मलखांब, भारतीय व्यायाम पद्धती, दंडबैठक, भूमी नमस्कार, सूर्य नमस्कार , लाठीकाठी , भारतीय नृत्य ,योगा, मेडिटेशन यांचे सादरीकरण करून आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. भारतीय संस्कृती आणि शिक्षण पद्धतीचे दर्शन पाहून जपानी पाहुणे प्रभावित झाले.
जपानी पाहुण्यांनी आणि विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी, आणि जपानी भाषेत शब्द आणि वाक्यांची आदान प्रदान करत संवाद साधला. यामुळे भारतीय आणि जपानी संस्कृतीची ओळख झाली.
जपानी शिष्टमंडळाने शाळेतील चालणाऱ्या कार्यपद्धतीची पाहणी केली आणि स्कूल मधील अध्यापन पद्धती समजून घेतली. जपानी शिक्षण पद्धती आणि भारतीय शिक्षण पद्धती यावर उभयतांची चर्चा झाली. प्ले ग्रुप पासून आपल्या मातृभाषेबरोबरच  इंग्रजी  , अबॅकस, रोबोटिक्स आणि प्रोग्रामिंग हे उपक्रम चैतन्य स्कूलमध्ये राबविल्या जातात हे पाहून त्यांना आनंद झाला.
विद्यार्थ्यांसाठी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे जपानी पाहुण्यांनी कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा करीत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी भरभरून प्रशंसा केली.
या संपूर्ण उपक्रमामध्ये शिक्षकांनी ,विद्यार्थ्यांनी आणि व्यवस्थापन समिती सदस्यांनी भाग घेतला. आलेल्या पाहुण्यांना स्वामी *विवेकानंदांचे आत्मचरित्र* हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.या संपूर्ण उपक्रमामध्ये शिक्षकांनी ,विद्यार्थ्यांनी आणि व्यवस्थापन समिती सदस्यांनी भाग घेतला. आलेला पाहुण्यांना स्वामी *विवेकानंदांचे आत्मचरित्र* हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे  आभार स्कूलच्या प्रिन्सिपल  श्रीमती  हेमलता खेडकर यांनी केले. या पूर्ण कार्यक्रमाचे समन्वय अभिषेक खेडकर व अविनाश मुळे यांनी केले.

error: Content is protected !!