तळेगाव दाभाडे: माजी नगरसेवक व पुणे महानगरनगर नियोजन समितीचे माजी सदस्य व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष छबुराव भेगडे  यांची सोशल मीडियावर बदनामी केली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात सहा जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण मालपोटे, अतुल मराठे, किशोर सावंत, अक्षय धामणकर, भरत येवले, प्रशांत जांभळे अशा सहा जणांच्या विरोधात तळेगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. संतोष भेगडे यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती .
संतोष भेगडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष आहेत.ते व्यावसायिक असून,  बांधकाम साहित्य पुरवठादार आहेत. त्यांचा फोटो वापरून ‘होय मी मलिदा गँगचा सभासद’ असा मजकूर समाजमाध्यमांवर टाकून त्यांची बदनामी केल्याचे दिसून आले. त्यावरून अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. पुढील  तपास शहर पोलीस करीत आहे.

error: Content is protected !!