इंदोरी: विद्यार्थ्यांमध्ये खरा बदल हा शिक्षण व्यवस्थेमुळे होत असतो. जागतिकीकरण व स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात आज वाढल्याआहे. त्या अनुषंगाने आधुनिक शिक्षण देणे हे शिक्षण संस्थांच्या समोर एक मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. “विश्वगुरू होण्याचे भारताचे स्वप्न, काळाची गरज ओळखून शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल घडवून पूर्णत्वास येऊ शकते.
भावी काळाच्या परिस्थितीचे आवाहन पेलण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांना घडवण्यातुन तयार होऊ शकते “असा विश्वास मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व मावळ रोटरी क्लबचे प्रशांत भागवत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. शाळा राबवत असलेल्या उपक्रमाची स्तुती करत असताना प्रमुख पाहुणे भागवत म्हणाले” शाळा आधुनिकते बरोबर भारतीय परंपरा जपत यशाचे एकेक शिखरे पादांक्रात करत आहे. शाळेमध्ये विविध अंगी उपक्रमाद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास साधला जातो.
मुलांना संस्कार क्षम बनवणे, संस्कार त्यांच्यामध्ये रुजवणे हे अत्यंत महत्त्वाचे काम शाळा, संस्कृत शिक्षण व तसेच भगवद्गीतेचे शिक्षण देऊन करत आहे. शाळेमध्ये प्रामुख्याने भारतीय व्यायाम पद्धती तसेच सूर्यनमस्कार, मल्ल खांब, तायकांडो ,जुडो इत्यादीचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाते”आधुनिकीकरणांमध्ये आपल्या मुलांचा सहभाग कुठेही कमी पडू नये या उद्देशाने आज रोबोटिक्स व अबॅकस अशा विषयांच्या अध्यापनाची सुरुवात शाळेने केली आहे.
कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थितांच्या हस्ते अबॅकस कीटचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशांत भागवत (उद्योजक), विजया आगळणे अॅड.संजय शिंदे, अमोल उबाळे , अमोल उबाळे ,पालक प्रतिनिधी म्हणून रोहित चाफेकर , स्वप्निल मस्के, सतीश पवार, मंगेश मालते, शितल नागरगोजे , ज्योती इपार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व प्रमुख उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमांचे प्रास्ताविक उपप्राचार्य रत्नमाला कापसे यांनी केले.आभार प्राचार्य हेमलता खेडकर यांनी केले.