आंदोलन
कार्ला –  इंद्रायणी नदीवरील कार्ला मळवली  पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा या मागणीसाठी परिसरातील  भाऊसाहेब  हुलावळे,संदिप तिकोणे ,संदिप गायकवाड ,कैलास येवले या  चार युवकांनी आज सोमवारी अंगठे धरो आंदोलन करण्यात आले होते.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात या पुलाचे रुंदीकरण व नूतनीकरण काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम व्हावे अशी नागरिकांची मागणी होती मात्र काम मोठे असल्याने ते काम पूर्ण झाले नव्हते. वेळोवेळी याबाबत आंदोलन झाल्यानंतर 28 ऑगस्ट पर्यंत पुल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते.  त्यानुसार शुक्रवारी या पुलावरून दुचाकी व हलकी वाहने यांची वाहतूक सुरू करण्यात आली होती.
मात्र पुलाचे उर्वरित काम व सुरक्षा भिंतीचे काम व लहान सहान कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत या मागणीसाठी अंगठे धरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची  दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेत एक महिन्यात सर्व काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले.

error: Content is protected !!