वडगाव मावळ:नराधमांना फाशी द्या..चिमुकल्यांना न्याय द्या..लहान मुली वरील बदलापूरची अत्याचार घटना व महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यात हे महायुती सरकार व गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरलेले असून सुसंस्कृत महाराष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख पुसून महाराष्ट्र युपी-बिहार च्या दिशेने वाटचाल करीत आहे. हे थांबलेच पाहिजे असा इशारा देत मावळात महाविकास आघाडने सरकारला धारेवर धरले.    राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नराधमांना कायदा सुव्यवस्थेचा मुळीच धाक राहिलेला नाही. सत्ताधारी कितीही लाडकी बहीण योजनेची जाहिरात करीत असले तरी आज महाराष्ट्रातील मुली, महिला, बहिणी सुरक्षीत नाहीत. या अन्यायाविरुद्ध आवाज ऊठवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील रोष आणि भावना आंदोलनाद्वारे मांडून राज्य सरकार विरुद्ध निषेध व्यक्त करत महाराष्ट्रात राज्यात घडत असलेल्या विकृतीला ठेचण्यासाठी हे अंदोलन असल्याचे महाविकास आघाडीने स्पष्ट केले.              अत्याचार घटनेचा निषेध व्यक्त करत नराधमांना फाशी द्या, चिमुकल्यांना न्याय द्या व हि केस फास्ट ट्रॅक वर चालावी अशा मागणीचे निवेदन मावळचे तहसिलदार मा. विक्रम देशमुख यांना देण्यात आले.                                 गृहमंत्र्यांचे लक्ष सत्तेवर कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर.- न्याय द्या न्याय द्या..लाडक्या बहिणीला न्याय द्या.- सुरक्षा द्या.. सुरक्षा द्या..बहिणीच्या लेकीला सुरक्षा द्या.- नराधमांना फाशी झालीच पाहिजे या घोषणा देत  मावळात निषेध व्यक्रण्यात आला.                                                                यावेळी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी दत्तात्रय पडवळ, यशवंत मोहोळ, अतुल राऊत,आशिष ठोंबरे, विशाल वहिले, राजेश वाघोले, उमेश गावडे, भारत ठाकूर, मंगेश ढोरे, जयश्री पवार, शैला खंडागळे, रत्नमाला करंडे, शादान चौधरी, पुजा वहिले, आरती.राऊत, नीलम.घाडगे, संगीता सोनवणे, पुष्पा भोकसे, रूपाली  क्षिरसागर, रंजना कदम, शोभा साठे, सईंद्रा  सातपुते, बॉबीताई डीक्का, जयश्री मदगे, वैशाली फाटक, सईं मोधळे,  रोहिदास वाळुंज, बाळासाहेब शिंदे, नंदकुमार कोतुळकर, शंकर भेगडे, मदन शेडगे, सोमनाथ धोंगडे, आफताब सय्यद, राजेश बाफना, बारकू दोरे, सोमनाथ कोंडे, महादू खांदवे, अनिस तांबोळी, राहील तांबोळी, संदीप शिंदे, नामदेव पानसरे, विशाल वाळुंज, सुनील चव्हाण, शांताराम नरवडे, माऊली काळोखे, राजू फलके, दामोदर मराठे, अमित घेनंद, बाळासाहेब फाटक, सुरेश गुप्ता, भरत भोते, राजू मोरे, राहुल नखाते, मारुती खोले, अक्षय साबळे, सागर गायकवाड, बाळासाहेब चव्हाण, कौस्तुभ ढमाले, सहादू आरडे, प्रतापराव हुंडेकरी, सतीश इंगवले, नवनाथ राणे, लक्ष्मण आखाडे, सिध्दनाथ नलावडे, सतीश शेलार, रवींद्र चव्हाण, सतीश गरुड, संतोष शिंदे, युवराज सुतार, कचरू गराडे, गोरख देवकाते, राहुल दवणे, दामोदर मराठे, अनिल खांदवे, दत्तात्रय गवारे, संदीप खाणेकर, बाळासाहेब पारीठे, संजय घाडगे, शांताराम दहिभाते, सचिन ढोरे, अजय भोसले, हनुमंत मोधळे, प्रशांत भालेकर, शाळकरी भगिनी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!