वडगाव मावळ:आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून कातवी गावांसाठी स्वतंत्र पाण्याची पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांने वडगाव नगरपंचायत हद्दीतील कातवी गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा पाईपलाईन सुरू होणार आहे.
एक वर्षापूर्वी कातवी गावातील ग्रामस्थांनी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्यासमवेत मावळचे आमदार सुनिल शेळके यांची भेट घेऊन कातवी गावासाठी पाण्याची स्वतंत्र पाईप लाईन करावी अशी मागणी केली होती. या मागणीप्रमाणे कातवी गावाकरिता आमदार सुनिल शेळके यांनी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतंर्गत निधीतून वडगाव नगरपंचायत हद्दीतील कातवीसाठी ही योजना मंजूर करून घेतली.
४ इंची स्वतंत्र पाणीपुरवठा पाईपलाईन व १५ एचपी चे दोन पंप अशा १४ लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाल्याने लगेचच कातवी ग्रामस्थ आणि माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करून प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात करण्यात आली.
यावेळी वैभव पिपंळे, ज्ञानेश्वर चव्हाण, विजय चव्हाण, मच्छिंद्र चव्हाण, प्रविण चव्हाण, किशोर चव्हाण, दिनेश चव्हाण, अविनाश चव्हाण, स्वप्नील चव्हाण, अंकुश चव्हाण, संतोष चव्हाण, सुवर्णा चव्हाण आणि कातवी ग्रामस्थ उपस्थित होते.
लवकरच पाण्याची स्वतंत्र पाईप लाईन चे काम पूर्ण होऊन कातवीतील पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे असा विश्वास मा नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि कातवीतील ग्रामस्थांनी व्यक्त करत आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले.