तळेगाव स्टेशन:मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थिनींनी तळेगाव दाभाडे येथील “विश्रांती वृद्धाश्रमात” रक्षाबंधन साजरा केला. यावेळी विद्यार्थिनींनी वृद्धांचे औक्षण करून त्यांना राखी बांधून आपणही ह्या समाजाचे देणे लागतो हे दाखवून दिले.तसेच त्यांना भेटवस्तू व मिठाई देण्यात आली. 

आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या वृद्धांना प्रेम,जिव्हाळा देणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे हे विद्यार्थांना समजावे हा उद्देश घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. वृद्धाश्रमातील वृद्धांना देखील ह्या उपक्रमामुळे आनंद झाला व आपल्या बहिणींच्या आठवणींना उजाळा  देता आला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्षाबंधन हा केवळ भावा बहिणीच्या नात्याचा सण नसून  सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा देखील आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.

  शाळेच्या प्रांगणात देखील रक्षाबंधनाचा सण उत्साहाने साजरा करण्यात आला. यामध्ये कु.अवनी पांडे ह्या विद्यार्थिनीने  रक्षाबंधनची माहिती विद्यार्थ्यांना दिली. मुलींसाठी राखी बनवण्याची स्पर्धा मुलांसाठी भेटकार्ड बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इ. १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या राख्या व भेटकार्ड देऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

 नर्सरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देखील अतिशय आनंदाने यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी देखील आनंदाने या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!