तळेगाव दाभाडे: रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे छत्र छाया प्रकल्पा अंतर्गत मावळातील विविध भागातील पेपर, फुल, फळ, भाजीवाले, गटई (चांभार) यांना ऊन, वारा, पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. छत्री दिल्याबद्दल विक्रेत्यांनी रोटरीचे आभार मानले.

 रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे विविध समाजउपयोगी प्रकल्प राबविले जातात. त्याचाच छत्रछाया हा आहे. छत्री वाटपावेळी

उद्योजक  मनोज ढमाले,माजी  ग्रामपंचायत सदस्य विष्णू हरिभाऊ घोटकुले, युवा उद्योजक संदीप घोटकुले , सचिन घोटकुले ,आकाश घोटकुले , आकाश घोटकुले , संभाजी  सावंत , सतिश घोटकुले, हनुमंत कटके , राजू घोटकुले , संभाजी घोटकुले, मल्हारी कदम , अक्षय सपकाळ , अंकुश घोटकुले , नितीन वाघमारे , दीपक वाघमारे , निखिल घोटकुले , लहू साळुंके , ओम घोटकुले , सुदेवी घोटकुले , स्नेहल घोटकुले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 लोकसंख्या झपाट्याने वाढत वाढत्या लोकसंख्येला सोयी-सुविधा घराजवळ उपलब्ध देण्यात छोट्या विक्रेत्यांचे योगदान आहे. हे विक्रेते उन्हातान्हात उभे राहून करतात. म्हणून पेपर, फुल, फळ, भाजीवाले विक्रेते, कामगारांना छत्र्यांचे गटई वाटप करण्यात आले. या छत्र्यांमुळे पाऊस, ऊन, वा-यापासून या विक्रेत्यांचे संरक्षण होईल, असे रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष नितीन घोटकुले म्हणाले. 

error: Content is protected !!