इंदोरी: येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गायलेल्या  स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सामाजिक कार्यकर्ता वैष्णवी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि ध्वजगीतांनी संपूर्ण वातावरण देश भक्तीने भरून गेले होते. 

  शौर्य  म्हस्के, प्रणिती चासकर ,समिता कांबळे, सानिया शेख या  विद्यार्थ्यानी देशभक्तीपर भाषणे केली. शिशु वर्गातील विद्यार्थ्यांनी आम्ही “भारताची संस्कारक्षम मुले” हा संदेश देणारा कार्यक्रम सादर केला . इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी “भारतीय व्यायाम पद्धती” ची प्रात्यक्षिक करून दाखवले.

 त्यामध्ये  मुलांनी दंड, बैठक ,भूमी नमस्कार,सूर्यनमस्कार ,लाटी काठी या अशा विविध भारतीय शारीरिक कसरतीचा व्यायाम केला. 

प्रमुख पाहुण्या वैष्णवी विनायक पाटील म्हणाल्या,”भारत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या वीरांनी आपल्या आहुती दिली त्यांच्या स्मरण कायम ठेवून ,देश भक्ती आणि समर्पण यांची बीज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये रुजली गेली पाहिजे.

 जागतिक पर्यावरणाचा विचार करता प्रत्येक मुलाने एक झाड ही संकल्पना स्कूलमध्ये राबवली जाते याचे विशेष  श्रेय सर्व शिक्षक , संचालक आणि पालक यांना जाते. कार्यक्रमांमध्ये  संस्थेचे संचालक ,पालक वर्ग उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षकांवृंदांनी मेहनत घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका खेडकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!