सोमाटणे: आढले बुद्रुक येथील गोधाम इको व्हिलेज उद्योजक मनोज ढमाले व बेबडओहळच्या ढमाले डेअरी येथे रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष नितीन घोटकुले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.ध्वजारोहण नंतर ध्वजगीत झाले.सुमधूर स्वरात राष्ट्रगीताचे गायन झाले.

यावेळी मनोज ढमाले,माजी  ग्रामपंचायत सदस्य विष्णू हरिभाऊ घोटकुले, युवा उद्योजक संदीप घोटकुले , सचिन घोटकुले ,आकाश घोटकुले , आकाश घोटकुले , संभाजी  सावंत , सतिश घोटकुले, हनुमंत कटके , राजू घोटकुले , संभाजी घोटकुले, मल्हारी कदम , अक्षय सपकाळ , अंकुश घोटकुले , नितीन वाघमारे , दीपक वाघमारे , निखिल घोटकुले , लहू साळुंके , ओम घोटकुले , सुदेवी घोटकुले , स्नेहल घोटकुले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील खेडोपाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शाळा, महाविद्यालय,ग्रामपंचायत कार्यालय,मंडलाधिकारी कार्यालय,विविध सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने ध्वजवंदन कार्यक्रम झाले. शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यानी,शिक्षकांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

आढले बुद्रुक येथील गोधाम इको व्हिलेज मध्ये बाराही महिने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील  स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाखण्यासारखा होता. सडारांगोळी काढून आकर्षक सजावट करण्यात आली होती.देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमून गेले होते.

 रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष नितीन घोटकुले म्हणाले,”स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात अनेक आहुती गेल्यावर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे.कित्येक बलिदानानंतर आपण स्वातंत्र्याचे हे वैभव अनुभवत आहोत.त्याच्या बलिदानातून प्रेरणा घेत आपण स्वतःसाठी न जगता देव,देश व धर्मासाठी समर्पण भावनेने जगलो पाहिजे.

error: Content is protected !!