लोणावळा:महारष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो याकरिता लोणावळ्यात शिवसेना परिवार तर्फे स्वयंभू श्री गणेश मंदिर अंबरवाडी येथे सायंकाळी मंत्रांच्या घोषात महा आरती करण्यात आली.तसेच खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षरोपण करण्यात आले.
ह्या प्रसंगी माजी पुणे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,काँग्रेस पक्षाचे चिटणीस निखिल कवीश्वर ,माजी नगरसेविका वृंदा गणात्रा ,दादा धुमाळ, अरुण लाड, माजी जिल्हा संघटक महेश खराडे,वाहतूक सेना तालुका अध्यक्ष लक्ष्मण दाभाडे, जेष्ठ शिवसैनिक शंकर जाधव, जितेंद्र राऊत, दीपक हुंडारे, संजय जेधे, सदानंद पिलाने,दिनेश वीर,सुनिल इंगुळकर, सतीश गोणते, अजय ढम,तेजस खराडे,चिराग खराडे उपस्थित होते.
कुमारी शिवानी रामशंकर गुप्ता, कु सागर राजू परदेशी,कुमारी दिव्या वीरेंद्र पारख, कु ऋग्वेद महेंद्र वैद्य ह्या युवकांचा सी ऐ परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल शिवसेना परिवार लोणावळा यांच्या तर्फे विशेष सन्मान करण्यात आला.