चाकण: चाकण चौक, पुणे नाशिक हायवे येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडवावी अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष निलेश श्रीपती थिगळे यांनी केली.
थिगळे यांनी राजगुरुनगरचे तहसीलदार यांना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली आहे.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात,थिगळे म्हणाले,”पुणे नाशिक हायवेवरील चाकण चौक (आंबेठाण चौक, तळेगाव चौक) येथे रोज वाहतूक कोंडी होत असते, दोन दोन तीन किलोमीटरच्या रांगा लागतात, परिणामी लोकांची गैरसोय होते, वेळ जातो, अपघातांचे प्रमाण देखील खूप वाढलेले आहे, कित्येकांचा नाहक बळी गेला आहे, तरी आपण त्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी .
- तळेगाव चाकण रस्त्यावर अवेळी धावणा-या कंटेनरला लगाम कधी?
- बहिणाबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त चुलीवर भाकरी करताना ऐतिहासिक कविसंमेलनशब्दधन काव्यमंचाचा उपक्रम
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये’स्पेस ऑन व्हील्स’ हा अनोखा उपक्रम
- पिंपरी – चिंचवड कार्यकर्त्यांची खाण – दादा वेदक
- संस्कार प्रतिष्ठानच्या यशात मानाचा तुरा