लोणावळा: लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे धरणांच्या पाणीसाठयात मोठी वाढ होत आहे.परिणामी लोणावळा धरणातून विरहित सांडव्यावरून अनियंत्रित स्वरूपात विसर्गा होण्याची शक्यता असल्याने इंद्रायणी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

या बाबत टाटा पॉवरने प्रसिद्धी पत्र काढले आहे,या पत्रात म्हटले आहे की,दि. २४ जुलै २०२४ रोजी सकाळी १०:०० वा. लोणावळा धरणाची जलाशय पातळी ६२४.४२ असून पाणीसाठा ८.१३ द.ल.घ.मी. (७०.९३%) आहे. धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पर्जन्याचा काळ पाहता पुढील ४८ तासांमध्ये धरणाच्या द्वार विरहित सांडव्यावरून अनियंत्रित स्वरूपात नदीपात्रात विसर्गास सुरवात होऊ शकते.

विसर्ग टाळण्याकरिता जास्तीत जास्त पाणी पश्चिमे कडे वळवून खोपोली वीजगृहातून वीजनिर्मिती करण्यात येत असून : मोठ्या प्रमाणात अवकाची नोंद होत आहे टाटा धरण व्यवस्थापण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन असून; त्याबाबत इत्यंभूत माहिती आपणास कळविण्यात येईल.

तरी इंद्रायणी नदीपात्रामध्ये कोणीही प्रवेश करू नये; आणि नदीपात्रामध्ये जनावरे, शेत पंप, अवजारे आणि इतर तत्सम साहित्य तात्काळ काढून घेण्यासंबंधी सूचना द्याव्यात. 

error: Content is protected !!