शिळींब सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी भगवान दरेकर यांची निवड

पवनमावळ – पवन मावळ विभागातील महत्वाच्या शिळींब विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. शिळींब (ता. मावळ) या संस्थेच्या पदाधिकारी आणि तज्ञ संचालक पदाची निवड प्रक्रिया मंगळवारी पुर्ण झाली. यावेळी चेअरमनपदी प्रकाश धनवे, व्हाइस चेअरमन पदी निवृत्ती धनवे आणि तज्ञ संचालक पदी भगवान दरेकर यांची निवड करण्यात आली.

गावातील श्री विठ्ठर रुक्मिणी मंदिरातील सभागृहात ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी चेअरमन पदासाठी प्रकाश राघू धनवे यांचा एकमेव अर्ज आला, त्यामुळे त्यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. तसेच व्हाइस चेअरमन पदासाठी निवृत्ती चिंधू धनवे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची देखील अविरोध निवड झाली. यावेळी सर्व संचालकांच्या ठरावानुसार संस्थेच्या तज्ञ संचालक पदी भगवान नारायण दरेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंदार कुलकर्णी यांनी यावेळी कामकाज पाहिले आणि सर्व निवडींची घोषणा केली. रामदास पाठारे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.

यावेळी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर संचालक मंडळ, सुरेश जगताप, जालिंदर ढमाले, सचिन शिंदे, अनिता धनवे, शाम चोरघे, बायडाबाई ढमाले, निवृत्ती कडू, अविनाश शिंदे, मधुकर केदारी, भाऊ शिंदे, बबन आखाडे, गोरख धनवे यांच्या उपस्थितीत आणि सहमतीने या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या. चेअरमन, व्हाइस चेअरमन आणि तज्ञ संचालक यांच्या निवडीनंतर उपस्थितांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी, संचालक यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी आबासाहेब गोणते, नामदेव गोणते, लाला गोणते, भगवान पडवळ, विठ्ठल ढगे, वाघुजी साठे, जगन्नाथ गोणते, बबन शिंदे, सचिन वाळूंज, बबव जाधव, पंडीत जाधव, भरत धनवे, राजू धनवे, कडू सर, विजय नकटी, बाजीराव ढमाले, अंकूश धनवे, बाळासाहेब दरेकर, एकनाथ दरेकर, गावातील ग्रामस्थ, युवक आणि विविध क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!