देहूरोड:पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अँड ज्युनिअर कॉलेजात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी गुरुपूजन व पालकांचे गुरुमंत्राच्या संगीतमय वातावरणात पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. 

कार्यक्रमाची सुरुवात सर्व पालकांच्या स्वागताने केले,विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांचे व आई- वडिलांचे मोठ्या सन्मानाने पाद्यपूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.या उपक्रमामुळे पालक भारावून गेले.विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेतून गुरूवंदना, ‘गुरूचे महत्त्व ‘ गुरुविषयी आपल्या मनोगताद्वारे आदरभाव व्यक्त केला.

विद्यार्थ्यांनी स्वतः पालकांचा सन्मान करताना ‘सर्वश्रेष्ठ आई-बाबा’ असा त्यांच्या चेहऱ्यावर आदरभाव दिसत होता

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तज्ञशिक्षक प्रा.कुमार खोले सर होते, त्यांनी भविष्यामध्ये विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले,व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा.शैलेंद्रसिंग परदेशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

 प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक भालेराव सर यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इ.११वी आणि इ.१२वीच्या विद्यार्थ्यांनी केले,कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्राध्यापिका जयश्री ओझर्डे मॅडम आणि प्रा.सुनील कोंडे सर, अनंता वाजेनाना यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,प्रा.रमाकांत देशपांडे सर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.संचिता ठाकूर या विद्यार्थिनीने केले तर पियुष चोवसिया या विद्यार्थ्याने आभार मानले.

error: Content is protected !!