
इंदोरी: इंदोरीतून जाणा-या तळेगाव चाकण महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची दुरूस्ती करा अशी मागणी ऋतुराज काशिद यांनी केली आहे.तळेगाव चाकण रस्त्यावरील इंदोरी गावातील नॅशनल हायवे NH4 मध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
त्यामुळे इंदोरी गावातील जनसेवा जनहित सोशल फाऊंडेशनचे संस्थापक ऋतुराज प्रदीप काशिद पाटील यांनी
नॅशनल हायवे NH4 चे संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर रस्त्याच्या खड्ड्यांची परिस्थिती सांगितली. त्यांनी तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवून दिले. तसेच यापुढे कधीही खड्डे पडले तर ते बुजवून देऊ असे आश्वासन दिले.
- कर्तृत्वाने मोठे होऊन चांगले वागा: देशमुख महाराज
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगावात टँकरने मोफत पाणी पुरवठा
- शनिवारी वडगावमध्ये पोटोबा महाराजांचा उत्सव
- रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर कामशेत येथे संपन्न : रामदास आठवले यांनी केले मार्गदर्शन
- राज्यस्तरीय मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत पैसाफंड शाळेचे यश




