इंदोरी:गावच्या बैलगाडा घाट परिसरामध्ये इंदुरी गावचे ग्रामस्थ,आर्ट ऑफ लिविंगचे स्वयंसेवक, टाटा मोटर्स मित्रपरिवार, चला मारू फेरफटका ग्रुप ,चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, वृक्षदाई प्रतिष्ठान देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपण करण्यात आले.
या पुढील सलग चार वर्ष येथे लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी बैलगाडा संघटना, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल व आर्ट ऑफ लिविंगचे स्वयंसेवकांनी स्वीकारली आहे.
चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक भगवान।शेवकर यांनी प्रत्येक मुलाला एका झाडाचे पालकत्व देऊन संगोपनाच्या कार्यामध्ये आपले अनमोल योगदान देण्याची संकल्पना मांडली.या संकल्पनेला साद देत सर्व विद्यार्थी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस