तळेगाव दाभाडे: विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक व पालकांनी विशेष परिश्रम घेतले पाहिजे असे प्रतिपादन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी येथे केले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व कै.अँड.शलाका संतोष खांडगे चारिटेबल ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने संस्थेच्या संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळा मधील शिक्षकांकरता शिष्यवृत्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.त्याचे उद्घाटन खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी महेश भाई शहा होते.
या कार्यक्रमास एकविरा विद्या मंदिर शाळेचे चेअरमन एस. एम .गोपाळे ,छत्रपती शिवाजी हायस्कूलचे चेअरमन यादवेंद्र खळदे, संस्थेच्या विविध शाळांमधील मुख्याध्यापक वासंती काळोखे ,भाऊसाहेब आगळमे,संजय वंजारे, कैलास पारधी, सविता चव्हाण आदी उपस्थित होते.
या या शिष्यवृत्ती कार्यशाळेस तज्ञ अमित सारडा व सुरेखा थोपटे, उमेश इंगुळकर, मोहिनी ढोरे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे व पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी केले होते .सूत्रसंचालन उमेश इंगोळकरांनी केले.
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा
- स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा २० एप्रिलला होणार सामुदायिक विवाह सोहळा: अध्यक्षपदी अजय धडवले, कार्याध्यक्षपदी प्रवीण कुडे तर कार्यक्रमप्रमुखपदी संजय दंडेल