टाकवे बुद्रुक:आषाढी एकादशी निमित्त इंगळूण येथील महादेवी माध्यमिक विद्यालयात माऊली तुकारामाचा गजर करीत दिंडी निघाली. विठ्ठल नामाच्या जयघोषात विद्यार्थी वारकरी दंगून गेले.शाळकरी विद्यार्थ्याने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली होती.
या माध्यमातून वारकारी सांप्रदायिक महोत्सवाचे महत्त्व विशद केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रूख्मिनी, संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
चिमूकले बालगोपालांनी विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण परिसर भक्तीमय केला होता. विठ्ठल नामाच्या जपाबरोबरच विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती जपण्याचे मनोदय व्यक्त होत आहे.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस