पिंपरी:लायन्स इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 च्या रिजन चेअरमन पदी 2024-25 वर्षासाठी लायन प्रा. शैलजा सांगळे यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील 22 लायन्स क्लब त्यांच्या रीजन मध्ये आहेत व त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. 

लायन प्राध्यापक शैलजा सांगळे 1991 सालापासून गेली 34 वर्षे सतत लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक सेवा करीत आहेत. जवळजवळ 300 शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा घेऊन त्यांनी 70 हजारापेक्षा जास्त मुलींना सक्षम बनवले आहे. 

आजपर्यंत तीन वेळा त्यांनी वेगवेगळ्या क्लबचे अध्यक्षपद भूषवले आहे व प्रत्येक वेळेस प्रांतपालन कडून त्यांना ‘बेस्ट प्रेसिडेंट’ या पारितोषिकाने गौरवण्यात आले आहे. 25 वर्षे सतत तन, मन व धन अर्पून त्यांनी केलेल्या कार्या बद्दल लायन्स तर्फे 2018 साली त्यांना ‘लायन भूषण पुरस्कार’ व 20 ग्रॅम सोन्याचे कडे देऊन तसेच ‘बेस्ट लायन’, ‘बेस्ट कॅबिनेट ऑफिसर’ ‘नारी सन्मान पुरस्कार’ इत्यादी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 लोकमत तर्फे यशस्वी नवदुर्गा पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘जिजाऊ पुरस्कार’, ‘मोरया पुरस्कार’, ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’, ‘विद्या रत्न पुरस्कार’ इत्यादी 20 पुरस्कारांनी विविध सामाजिक संस्थांनी त्यांना गौरवले आहे.त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!