पुणे:ब्लॉक्स , सिमेंटकाँक्रीट खाली झाकली गेलेल्या झाडांचा श्वास मोकळा करा ,अशी मागणी टेलस ऑर्गनायझेशन आणि महा एनजीओ फेडरेशने केली आहे. टेलस ऑर्गनायझेशन आणि महा एनजीओ फेडरेशने एक सर्वेक्षण करून ब्लॉक्स , सिमेंटकाँक्रीट खाली झाकली गेलेल्या झाडांची सविस्तर माहिती प्रशासनाला दिली आहे.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण करण्याचे  धोरण राबवून झाल्या वर,आता पुण्याच्या सिंहगड रोड आणि डी पी रोडवरही मोठ मोठ्या झाडांनाही सिमेंटने सोडलं नाही. सिंहगड रोड गणेश मंदिर ते विवेकानंद विद्यालय तसेच राजाराम पुल येथील डी पी रस्त्यावर अनेक मोठी झाडे सिमेंट काँक्रिट तसेच पेव्हर ब्लॉक मध्ये अडकून पडली आहेत.

यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये या करता   टेलस ऑर्गनायझेशन संस्थेचे लोकेश बापट आणि महा एन जी ओ फेडरेशनचे श्री मुकुंद शिंदे यांनी गेले तीन आठवडे  पुण्यातील या जागेचे निरीक्षण केले. या संदर्भातील सर्व अशा झाडांचे  फोटो प्रिंट  काढून निवेदन पत्र सिंहगड तसेच वारजे क्षेत्रीय कार्यालयात सहायक उप आयुक्त यांच्या कडे दिले. 

ह्या दरम्यान या भागात अनेक  झाडे अशी आहेत की झाडांच्या  बुंध्याजवळच सिमेंट काँक्रिट केले गेले आहे . तसेच DP रोड कर्वेनगर भागात देखील अशी काही मोठी झाडे आहेत. संपूर्ण झाडांची मुळे जर अशा पद्धतीने ब्लॉक्स , सिमेंट, काँक्रिट खाली झाकली गेली तर भविष्यात ही झाडे पडून मोठ्या दुर्घटना घडण्याची भविष्यात घडू शकतात. 

पुणे महा  नगर पालिकेचे अधिकारी, ठेकेदार व इतर यांनी कृपया या गोष्टींकडे गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती या निवेदनात केली गेली आहे. सिंहगड रोड आणि

डी पी रोड येथील झाडा भोवती टाकलेले सिमेंट ताबडतोब काढून त्या भोवती विटांचे आळ, माती करून झाडांना मोकळे करावे तसेच शहरातील झाडांची पाहणी करून अशी प्रकारच्या वृक्षांना मोकळा श्वास घेऊन द्यावा आणि भविष्यातील अनर्थ टाळावा .

 अशी मागणी लोकेश बापट आणि मुकुंद शिंदे यांनी केली आहे. सिंहगड रोड वरील गणेश मंदिर ते विवेकानंद विद्यालय येथील अनेक झाडांना आता जागा मोकळी करून आळी  घालण्यात आली आहेत.याच धर्तीवर हा उपक्रम हाती घ्यावा अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!