एनएमआयईटी महाविद्यालयाचा तिसरा विश्वविक्रम एकाच दिवसात १५५ शोधनिबंध जर्नलमध्ये सादर
तळेगाव स्टेशन:नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाने तिसरा विश्वविक्रम प्रस्थापित करून पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. २४ मे २०२४ या एकाच दिवसात वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळ्या विषयांवरचे पेपर नामांकित जर्नलमध्ये १५५ शोधनिबंध यशस्वीरीत्या सादर केले.
ही अविश्वनीय कामगिरी संशोधन आणि शैक्षिणिक उत्कृष्टतेसाठी संस्थेचे समर्पण दर्शविते. यापूर्वीच्या जागतिक विक्रमांबरोबरच एनएमआयईटी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून नाव कमावत आहे.
नवीन कल्पना, विचार , उद्देशांसह विशिष्ट विषयांवर विविध बाजुंनी विचार विनिमय व विविध संदर्भ वापरून शिस्तबद्ध मांडणी करून या शोधनिबंधाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण कौशल्यावर प्रकाश टाकत शोधनिबंधांमध्ये विविध विषयांचा समावेश आहे.
संस्थेचे अध्यक्ष संजय ( बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेशची म्हस्के, संस्थेचे विश्वस्त रामदास काकडे, महेशभाई शहा, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार यांनी प्राचार्य डॉ. विलास देवतारे, संशोधन व विकास अधिष्ठाता प्रा. प्रितम आहिरे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नितीन धवस, सर्व विभागप्रमुख डॉ.शेखर रहाणे, डॉ. सागर जोशी, डॉ. चंद्रकांत कोकणे, डॉ. सौरभ सावजी यांचे एकाच दिवसात नामांकित जर्नल्समध्ये १५५ शोधनिबंध सादर करून ” वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया ” मध्ये नोंदणी केल्याबद्दल तसेच सर्व विभागीय प्रकल्प समन्वयक, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पूर्ण एनएमआयईटी टीम चे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस