श्री एकविरा विद्या मंदिर शाळेच्या दोन विद्यार्थीनींचे शिष्यवृती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान
कु समृद्धी काळे व कु प्रणाली नरवडे शिष्यवृती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकल्या
कार्ला- मावळ तालुक्यातील नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळच्या श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील दोन विद्यार्थींनी इयत्ता आठवी पुर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेत पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे.
यामध्ये कु समृद्धी राहुल काळे व कु प्रणाली दिपक नरवडे विद्यार्थींनींने पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत आपली चमक दाखवली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देणाऱ्या त्यांना मार्गदर्शन करणारे उमेश इंगुळकर यांचे देखील अभिनंदन होत आहे.
या यशस्वी विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे गुरुजी,नविन समर्थ विद्यालयाचे समिती अध्यक्ष महेशभाई शहा,मुख्याध्यापक संजय वंजारे यांनी शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान केला.
या दोन्हीही विद्यार्थांंनीने गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे ,सचिव संतोष खांडगे,सहसचिव नंदकुमार शेलार,खजिनदार राजेश म्हस्के, सरंपच दिपाली हुलावळे,उपसरपंच किरण हुलावळे ,संस्था संचालक मंडळ सर्व कार्ला ग्रामपंचायत सदस्य,शाळेचे शिक्षक शिक्षेके-तर कर्मचारी तसेच कार्ला परिसरातील ग्रामस्थांनकडून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!