वडगाव मावळ:येथे चोरीला गेलेला ट्रान्सफॉर्मर माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि महावितरण विभागाच्या सहकार्याने बसविण्यात आला आहे.गेल्या नऊ दिवसांपूर्वी वडगाव नगरपंचायत हद्दीतील एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या भारत पेट्रोलियम पंपाजवळील गोरगरीब वस्ती असलेल्या घरकुल वसाहत व इतर भागाला विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरण विभागाच्या डिपीवरील ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी चोरून नेल्याने तब्बल नऊ दिवसांपासून या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. 

त्यानंतर लगेचच घरकुल भागातील रहिवाशांनी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्याशी संपर्क साधून घडलेली सर्व माहिती कळविल्यानंतर त्वरीत मोरया प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयातून महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता मनोज नेमाडे यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध झाला. नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी मा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी जेसीबी उपलब्ध करून देत विशेष सहकार्य केले.

तब्बल नऊ दिवसांपासून अंधारात असलेल्या या रहिवाशांनी आज लाईट आल्यानंतर नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि महावितरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले. 

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, सहाय्यक अभियंता मनोज नेमाडे, लकडे साहेब, वायरमन विपुल मराठे, विलास आगळमे, पुरुषोत्तम खाडे आणि प्रतिष्ठानचे यशवंत शिंदे, अरुण कालेकर आणि मोरया प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयाचे वेळोवेळी सहकार्य मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!