जागतिक वसुंधरा दिनानिमित्त एनएमआयईटीच्या विद्यार्थ्यांनी केला अनोखा उपक्रम
तळेगाव स्टेशन: नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून, प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी स्तुत्य उपक्रम केला.
पीबीएल प्रोजेक्ट अंतर्गत, विद्यालयीन परिसरातील वृक्षांची नावे,औषधी गुणधर्म व इतर माहिती ही क्यूआर कोडच्या माध्यमातून झाडांवर लावण्यात आली.तसेच दीर्घकाळ झाडांना पाणी देण्यासाठी मुळाशी व्यवस्था करण्यात आली.
या प्रयोगाच्या पूर्णत्वासाठी प्रा.हर्षल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विनीत चौधरी, तन्वी धनोकार, आदित्य बोरसे, सिद्धी बेडगे, गौरी डेरे, पिनाक ढबू, सानिका आहिरे, ऐश्वर्या आढाव, निहारिका गायकवाड, समृद्धी चासकर, राहुल गायकवाड, मयूर चव्हाण या विद्यार्थ्यांनी काम केले.
या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, सीईओ डॉ.रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. विलास देवतारे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.नितीन धवस व विभाग प्रमुख डॉ.शेखर रहाणे यांनी अभिनंदन केले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस