शिल्पकार सुप्रिया शिंदे यांना मानांकन

तळेगाव दाभाडे: श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि स्वामींच्या एक हजार १३१ किलोंच्या अस्सल तांब्याच्या मूर्तीचे एकसंघ कास्टिंग केल्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाच्या वतीने रविवारी (ता. २१) जगप्रसिद्ध महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांचा मानांकन प्रदान सोहळा होणार आहे. 

वर्ल्ड रेकॉर्ड.ऑफ इंडियाचे सीईओ पवन सोळंकी यांच्या हस्ते सन्मान प्रदान केला जाणार आहे. तळेगाव चाकण रस्त्यावरील वनश्रीनगरजवळील स्वामी समर्थनगर येथे सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी अबुधाबी येथे जागतिक शिल्पकला प्रदर्शनामध्ये जगभरात आपला ठसा उमटवला होता.

संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सुप्रिया शिंदे यांना महिला शिल्पकार म्हणून गौरविण्यात आलेले आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, स्वामी समर्थ इत्यादी तसेच शरद पवार, किसनराव बाणखेले यांच्यासारख्या राजकीय पुढारींचे पुतळे त्यांनी आत्तापर्यंत घडविले आहेत.

error: Content is protected !!