तळेगांव दाभाडे:औद्योगिक संघटना आणि औद्योगिक सुरक्षा संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगांव एमआयडीसी मधील सर्व कंपन्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण व सुरक्षा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये तळेगांव एमआयडीसी मधील सर्व कंपन्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
औद्योगिक सुरक्षा संचनालयाच्या अतिरिक्त संचालक शारदा होंदुले यांनी उपस्थितांना कारखाने अधिनियम याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत औद्योगिक सुरक्षा संचनालयाचे उपसंचालक श्री दोरुगडे व श्रीमती तृप्ती कांबळे यांचीही कार्यक्रमाला मोलाची उपस्थिती होती.
तळेगांव दाभाडे औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षा अनु सेठी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले. संघटनेचे सचिव माननीय जगदीश यादव व सदस्य विनायक साळुंखे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष कष्ट घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय विनायक साळुंखे यांनी उत्तमरीत्या पार पाडले.
सदर स्पर्धांमध्ये खालील स्पर्धक विजेते ठरले –
सुरक्षा पोस्टर श्रेणीमध्ये ऋतुजा रवणांग, हर्षदा गायकवाड, शुभम देसाई व विघ्नेश घोलप यांनी विशेष प्राविण्य मिळवले. सुरक्षा कविता श्रेणीमध्ये नजमा शेख, गणेश शेंडगे, छगन शिरभैये यानी विशेष प्राविण्य मिळवले.
सुरक्षा निबंध श्रेणीमध्ये संतोष सुतार, गर्वित जैन, प्रकाश कदम यांनी विशेष प्राविण्य मिळवले तर सुरक्षा घोषवाक्य श्रेणीमध्ये योगेश घोरपडे व सुधीर मगदुम यांनी विशेष प्राविण्य मिळवले.
सदर स्पर्धांमध्ये आलेल्या सर्व मटेरियलचे मूल्यांकन ब्रिजस्टोन कंपनीचे सुरक्षा अधिकारी माननीय श्री राहुल पाटील केले.
सदर उपक्रमातून तळेगांव दाभाडे औद्योगिक संघटना तसेच औद्योगिक व सुरक्षा संचनालय यांनी उद्योग जगतात सुरक्षा आणि स्वास्थ कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.