श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने अनंता कुडे यांना श्रीराम सामाजिक पुरस्का व डॉ.तृप्ती शहा यांना श्रीराम सामाजिक (वैद्यकीय)पुरस्कार प्रदान 

  वडगाव मावळ :

श्रीराम नवमी उत्सवानिमित्त येथील श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने मागील ४६ वर्षांपासून श्रीराम जन्म उत्सव साजरा करण्यात येत आहे. यावर्षी ह.भ.प पांडुरंग महाराज गायकवाड यांचे देवजन्माचे प्रवचन झाले. या कार्यक्रम प्रसंगी श्री पोटोबा देवस्थान चे विश्वस्त सचिव अनंता कुडे यांना श्रीराम सामाजिक पुरस्कार, तर डॉ तृप्ती शहा यांना श्रीराम सामाजिक (वैद्यकीय)पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.            वडगाव मधील जेष्ठ समाजसेवक स्वर्गीय ज्ञानेश्वर तुकाराम गाडे व स्वर्गीय श्रीमती पार्वती शंकरराव कदम यांचे स्मरणार्थ समाजामध्ये  सामाजिक बांधिलकी जपून सेवाभावी समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान संस्थेच्या वतीने केला जातो.

त्याअनुषंगाने यावर्षी अनंता कुडे यांना  गणेशोत्सव मंडळ सदस्या पासून झालेली सामाजिक कार्याची सुरवात  तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे सचिव पद सांभाळून केलेल्या पारदर्शक, निःस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेऊन समितीचे वतीने सन्मानित करण्यात आले.

तसेच डॉ.तृप्ती शशिकांत शहा यांनी पन्नास वर्षांपासून  वैद्यकीय सेवेमध्ये  अनेक गरजू रुग्णांला अतिशय माफक स्वरूपात केलेल्या सेवाकार्यांची तसेच वडगांव मध्ये सर्वात प्रथम महिला भजनी मंडळ स्थापन करून, तसेच गावातील अनेक महिलांना त्या काळात विमान प्रवास घडवून खऱ्या अर्थाने महिलांचे सबलीकरण  करून त्यांना एकत्र व्यासपीठ निर्माण करून देत असतांना या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांनापुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.                           यावेळी  मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी आपले मनोगतात संस्थेनी पुरस्कार्थी यांची केलेली निवड,त्यांच्या कार्याची दखल घेऊन हि सार्थ निवड केली आहे असे गौरवोद्गार  काढले. यावेळी श्री पोटोबा देवस्थानचे उपाध्यक्ष गणेश ढोरे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, अरुण चव्हाण, अशोकराव ढमाले, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,रेवती वाघवले, माजी  उपसभापती प्रविण चव्हाण, गंगाधर ढोरे, जितेंद्र कुडे,सनदी लेखपाल विजया आगळमे,तुकाराम गाडे,अतुल राऊत, अतिश ढोरे,श्रीनिवास कुलकर्णी, नितीन चव्हाण,प्रसाद पिंगळे,अर्चना कुडे आदिसह भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष  नंदकिशोर गाडे,सूत्रसंचालन  सचिव शिवानंद कांबळे, मानपत्रवाचन भुषण मुथा व स्नेहा भंडारी यांनी केले, आभार माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी मानले.महाप्रसादाने कार्यकमाची सांगता झाली.

error: Content is protected !!