आयटीयन्स’चा ‘मोदी 3.0’ साठी खासदार बारणे यांना पाठिंबा
पिंपळे सौदागरमधील आयटी इंजिनिअर्सचा बारणे यांना निवडून आणण्याचा निर्धार
पिंपळे सौदागर-
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी पिंपळे सौदागर भागात राहणाऱ्या आयटी इंजिनियर्सनी कंबर कसली आहे. ‘मोदी 3.0’ या नावाचा ग्रुप स्थापन करून त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले आहे.
खासदार बारणे यांनी शुक्रवारी संध्याकाळी रहाटणी व पिंपळे सौदागर भागात प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. माजी नगरसेविका निर्मला कुटे यांच्या निवासस्थानी ‘मोदी 3.0’ या आयटी इंजिनियर्सच्या समूहाने बारणे यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला. खासदार बारणे यांनी गेल्या दहा वर्षात मतदार संघामध्ये केलेल्या विविध विकास कामांची माहिती सर्व तरुणांना दिली. पुढील पाच वर्षातील कामाच्या नियोजनाबाबतही त्यांनी या तरुणांशी चर्चा केली. ‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’ च्या घोषणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला.
*बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन*
रहाटणी येथील क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन खासदार बारणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अरुण चाबुकस्वार तसेच निर्मला कुटे, राकेश नखाते आदी उपस्थित होते. या बाल आनंद मेळाव्याच्या निमित खासदार बारणे यांनी लहानग्यांसोबत काही आनंदाचे क्षण अनुभवले.
खासदार बारणे यांनी रहाटणी भागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्या समवेत तानाजी बारणे, मयूर बारणे, धनंजय चिंचवडे, दीपक विष्णू गुजर, अंकुश कोळेकर, सुदर्शन देसले, प्रदीप दळवी, दिलीप कुसाळकर, कानिफनाथ तोडकर, शरद राणे, सागर खेडेकर, योगेश गोडांबे, कुणाल ओव्हाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
रहाटणी येथे हरेश तापकीर, राजू नखाते, प्रसाद नखाते, गोविंद नखाते, विश्वनाथ नखाते, दगडू नखाते, चंद्रकांत नखाते, सविता नखाते, अनिल नखाते, सतीश नखाते, राजू खांदवे, नीलेश नखाते, बाळासाहेब नखाते, हरिभाऊ नखाते, राकेश नखाते, गणेश शिवराम नखाते, मनोज नखाते, स्वप्नील नखाते, सविता खुळे, सुरेश गोडांबे, दत्तात्रय गोडांबे, नंदू गोडांबे, योगेश गोडांबे, हरीश रेलवानी, इनरव्हील क्लब ऑफ पुणे क्वीन्सचे अध्यक्ष अंजली दशरथी, माजी नगरसेवक कैलास थोपटे, कुणाल थोपटे, पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय भिसे आदींच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली.
*बारणे यांच्या विक्रमी मताधिक्याचा निर्धार*
माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या चिंचवड केशवनगर येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. त्यावेळी सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, नीलेश डोके, बाळासाहेब वाल्हेकर, विठ्ठल भोईर, गतीराम भोईर, रवींद्र प्रभुणे, सतीश बलकवडे, निवृत्ती गावडे, दत्ताराम भोईर, नारायण लांडगे, महेश बारसवडे, राहुल भोईर, खंडूशेठ चिंचवडे, कैलास गावडे, जयराम भोईर, शिवाजी देशमुख, दीपक भोईर, काळूराम गावडे, दत्तात्रय चिंचवडे, प्रमोद भोईर, भारत भोईर, सतीश पाटील, दिलीप भेगडे आधी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस