




मावळ लोकसभातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करा : दिनेश शर्मा प्रभारी भाजपा महाराष्ट्र प्रदेश
कामशेत :
मावळ लोकसभातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा यांनी केले.महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना बहुमताने विजयी करण्याचा मावळ भाजपचा निर्धार आहे,अशी स्पष्टोक्ती मावळ निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी दिली.
येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग.बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते , सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्ष यांचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी दिनेश शर्मा यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे साहेब यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
तसेच ज्यांनी राम मंदिर निर्माण कार्यास विरोध केला,ज्यांनी ३७० कलम हटविण्यास विरोध केला अशा काँग्रेस, शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीतून आपण हद्दपार करावे व विकसित भारतासाठी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
त्याचसोबत मावळ विधानसभा कोअर कमिटीचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत देखील दिनेश शर्मा यांनी बैठक घेऊन मावळ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांशी समनव्य ठेऊन कार्य करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच श्रीरंग बारणे यांना मावळ विधानसभा मतदार संघातून ५० हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून देऊ असे आश्वासन निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी यावेळी बोलतांना दिले.
यावेळी भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपा पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, मावळ लोकसभा समन्वयक सदाशिव खाडे , पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख योगेश बाचल , मावळ भाजपा अध्यक्ष दत्तात्रय गुंड ,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर , युवा मोर्चा प्रदेश सचिव रघुवीर शेलार, प्रदेश भाजपा निमंत्रित सदस्य जितेंद्र .बोत्रे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण राक्षे , ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय माळी, लोकसभा विस्तारक भूषण जोशी, विधानसभा विस्तारक, रविंद्र देशपांडे, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष अशोक दाभाडे, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण लाड, देहूरोड शहर भाजपा अध्यक्ष रविंद्र उर्फ लाहूमामा शेलार , युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे, महिला मोर्चा अध्यक्षा सायली बोत्रे यांच्यासह मावळ विधानसभा मंडळ संघातील सर्व मंडळाचे सरचिटणीस सर्व सुपर वॉरियर्स,बूथ अध्यक्ष व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ




