तळेगावात भागवत ज्ञानयज्ञ सोहळा
तळेगाव स्टेशन:
श्रीराम नवमीच्या निमित्ताने यशवंतनगरमधील बालाजी मंदिरामध्ये गुढी पाडव्यापासून सातदिवसीय श्रीमद् संगीतमय भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार (ता. ९) पासून सोमवार (ता. १५) पर्यंत रोज सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत पुष्पक जोशी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भगवान गोपाल कृष्णाच्या अद्भुत लीला श्रवण करण्याची संधी तळेगावकरांना मिळणार आहे.
पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत अनुक्रमे भागवत महात्म्य-गोकर्ण कथा, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, श्रीराम जन्म, श्रीकृष्ण जन्मोत्सव, रासक्रीडा, अवतरणिका आदींचे कथा प्रवचन होणार आहे.
सोमवारी (ता.१५) दुपारी १२ ते २ दरम्यान महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री बालाजी प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
- तळेगाव चाकण रस्त्यावर अवेळी धावणा-या कंटेनरला लगाम कधी?
- बहिणाबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त चुलीवर भाकरी करताना ऐतिहासिक कविसंमेलनशब्दधन काव्यमंचाचा उपक्रम
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये’स्पेस ऑन व्हील्स’ हा अनोखा उपक्रम
- पिंपरी – चिंचवड कार्यकर्त्यांची खाण – दादा वेदक
- संस्कार प्रतिष्ठानच्या यशात मानाचा तुरा