तळेगाव स्टेशन:
नवलाखउंब्रे येथे श्री.रामनवमी जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व राम विजय ग्रंथ पारायण सोहळा संपन्न होत आहे.भगवान श्री राम प्रभुंच्या कृपाशिर्वादाने गुरूवार दि. ११/०४/२०२४ रोजी ते गुरूवार दि. १८/०४/२०२४ पर्यंत “राम विजय पारायण सोहळा” व “अखंड हरिनाम सप्ताह” आयोजित केला आहे.
पुणे जिल्हायातील अयोध्या अशी ओळख असलेले हे प्राचीन मंदीर आहे.।। श्रीरामाच्या मुर्ती येथे कशा रमल्या ।। ।। श्री शिवजीबुवा गुरव यांच्या साक्षात्काराने राम डोहामध्ये अवतरल्या ।।ही या मंदिराची अख्यायिका आहे.
शके १२३८ मध्ये स्वयंभु मुर्ती रामडोहात प्राप्त झाल्या. त्या रुढी परंपरेनुसार सालाबादप्रमाणे” श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा ” चैत्र शु ।। पाडवा ते चैत्र शु ।। पोर्णिमा पर्यंत संपन्न होत आहे. तरी सर्व ग्रामस्त्र व पंचक्रोशीतील भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
चैत्र शु ।। ९. बुधवार, दि. १७/०४/२०२४ रोजी स्वयंभु श्रीराम प्रभु मंदिरात पहाटे श्रीरामास अभिषेक, सकाळी १० ते १२ श्रीराम जन्माचे किर्तन, ह.भ.प. भगवान महाराज मचे यांचे किर्तन होईल.
दुपारी १२. १.३० वा. श्रीराम प्रभु वांचा जन्म दुपारी १.०० वा. महाप्रसाद, दुपारी १.३० वा. स्वयंभु श्रीरामाची पालखी मिरवणुक, गुरूवार दि. १८/०४/२०२४ रोजी सकाळी ९. ३० ते ११.३० ह.भ.प. तुषार महाराज दळवी (मावळ) यांचे काल्याचे किर्तन दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, सायं. ८.०० वा. श्रीराम प्रभु यांचा उटीचा कार्यक्रम, रात्री ९.३० वा. पालखी मिरवणुक, • शुक्रवार दि. १९/०४/२०२४ सकाळी ७.३० वा. पालखी मिरवणुक, दुपारी १२.३० वा. पादुका पुजन व कार्यक्रमाची सांगता होईल.
अनुक्रमे ह.भ.प. उमेश महाराज किर्रदत्त – सातारा (वाणी भुषण),ह.भ.प. बाबाजी महाराज चाळक – शिरूर,ह.भ.प. सौ. संगिता महाराज चोपडे (यनपुरे) मावळ,ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर (मांमचंद्र डोंगर),ह.भ.प. पांडुरंग महाराज शितोळे (बिड) यांची किर्तने होतील.