
तळेगाव दाभाडे:
मावळ तालुक्यात अग्रगण्य असलेला तळेगाव दाभाडेचे ग्रामदैवत श्री.डोळसनाथ महाराज यांचा चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडव्याचा सार्वत्रिक उत्सव यावर्षी दिनांक ०९ ते १२ एप्रिल पर्यत विविध धार्मिक कार्यक्रमातून साजरा होणार असल्याचे उत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन मारुती काकडे यांनी सांगितले.
या वर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, निकाली कुस्ती स्पर्धा, बैलगाडा स्पर्धा तसेच मनोरंजनाचे आदी कार्यक्रम करण्याचे उत्सव समितीने योजिले आहे,
यामध्ये दि.९ एप्रील रोजी सकाळी श्री. डोळसनाथ महाराज यांचा अभिषेक,दुपारी मोठ्या रकमेचे बक्षीस ठेवलेल्या बैलगाडा स्पर्धा,सायंकाळी श्री डोळसनाथ महाराज यांची पालखी मधून ग्रामप्रदक्षिणा, रात्री घोरावाडी स्टेशनाच्या मैदानावर कै.लोकशाहीर साहेबराव नांदवळकर यांचे आश्रयाखाली वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंपळे यांचा तंटा तिघींचा पण नवरा कुणाचा या वगनाट्यांव्दारे लोकनाट्य तमाशा तसेच श्री डोळसनाथ महाराज मंदिरा समोर श्री राम कला पथक मंडळ पवळेवाडी यांचे रंगीत संगीत भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
दुस-या दिवशी दि. १० एप्रील रोजी सकाळी लोकनाट्य तमाशाची हजेरी.तसेच गणपती माळ येथे दुस-या दिवशीच्या बैलगाडा स्पर्धाचे आयोजन केले आहे.तसेच दुपारी यात्रेकरूंची भांडाराच्या रूपाने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.रात्री ८ वाजता मारुती मंदिर चौकात डीपी रोडवर बारा गांवाच्या बारा अप्सरा हा आर्केट्राचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच दि. ११ रोजी सायंकाळी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत भोई आळी मळा येथील मैदानात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार आहे. यासाठी एकून ७ लाख ७ हजार ७७७ रुपया पर्यत बक्षिसे ठेवली आहेत. तसेच चांदीच्या गदा, शिव प्रतिमा, आदि रोख बक्षिसे ठेवण्यात आली असून याचे निवेदन पै.हंगेश्वर धायगुडे करणार आहेत.
दि. १२ एप्रील रोजी रात्री ८ वाजता शैलेश लोखंडे प्रस्तुत लावण्य चंद्रा आर्केट्राचा कार्यक्रम श्री डोळसनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात होणार आहे.
मावळ तालुक्यामध्ये नावलौकिक प्राप्त झालेला हा ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा उत्सव असतो. तरी डोळसनाथ महाराज उत्सव समिती, व मंदिर नवनिर्माण समिती यांनी केलेल्या आवाहना नुसार सर्वांनी सहभागी होऊन उत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन उत्सव समिती कडून करण्यात आले आहे.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ




