वाकसईत जगद्गुरू संत तुकाराम महाराज झाडाजवळ तुकाराम बिजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह
लोणावळा:
वाकसई येथे जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज झाडाजवळ तुकाराम बिजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे.वारकरी बांधव आणि भाविक विठ्ठल नामात तल्लीन होत आहे.
अनुक्रमे भागवताचार्य ह.भ.प.तुषारमहाराज दळवी (भाजे ), ह.भ.प.सागर महाराज पडवळ (वेहेरगाव ), ह.भ.प.अनिता महाराज मोरे( इंगवले ), ह.भ.प.राजेंद्र महाराज वाघमारे (गोंदिया ), ह.भ.प.शिवाजी आगिवले (कल्हाट) यांचे प्रवचन , तर ह.भ.प.पांडुरंग महाराज शितोळे (आळंदी देवाची ) , ह.भ.प.ज्ञानेश्वरी ताई वायभट (बऊर), ह.भ.प.माऊली महाराज काकडे (धाराशीव ),ह.भ.प.सुखदेव महाराज ठाकर (नागाथली ), ह.भ.प.विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर ), ह.भ.प.प्रविणमहाराज केदारी (ताजे), ह.भ.प. चांगदेव महाराज काकडे (बीड) यांची कीर्तने व प्रवचने होत आहेत. ता.२७ रोजी दुपारी १० ते १२ ह.भ.प.सुभाषमहाराज गेठे (आळंदी ) यांचे संत तुकाराम महाराज बीज सोहळा यावर कीर्तन होईल.तसेच सायंकाळी ह.भ.प.गणेश महाराज फाळके (कामशेत) यांचे प्रवचन आणि सायंकाळी ७ ते ९ ह.भ.प.सुदर्शान महाराज शास्ञी (ञिभुनेश्वर ) यांचे कीर्तन होईल.
तसेच ता.२८ रोजी ह.भ.प. महादेव महाराज बोरूडे( शास्ञी ) यांचे सकाळी १० ते १२ काल्याचे कीर्तन होईल अशी माहिती श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज झाड पादुकास्थान सेवा मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.भरतशेठ येवले आणि सप्ताह कमिटीचे अध्यक्ष ह.भ.प.गणपतराव भानुसघरे, अमोल केदारी यांनी दिली.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज याःचे गाथेचे पारायण सकाळी ८ ते ११ ,पहाटे चार ते सहा काकडाआरती , दुपारी १२ ते १ गाथा भजन , सायंकाळी ४ते ५ हरिपाठ ,साडेपाच ते साडेसहा प्रवचने आणि राञी ७ते ९ हरिकीर्तन तसेच राञी ११ ते ४ हरिजागर होईल.