वडगाव मावळ :
कोथुर्णेतील स्वराच्या हत्ये प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिस दलातील ‘दुर्गा श्वाना’ने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने आरोपीचा अचूक माग काढला. तिच्या तपासामुळे पहिल्यांदाच आरोपीला मोठी शिक्षा झाली आहे. यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांची प्रतिष्ठा उंचावली आहे.श्वानपथकाचे हँडलर सागर रोकडे यांनी समाधान व्यक्त केले.
२ ऑगस्ट २०२२ रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. याबाबतची नोंद कामशेत पोलिस ठाण्यात झाली होती. या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली होती.
घटनेचा तपास करण्यासाठी श्वानपथकाची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच वेळी रोकडे व त्यांचे सहकारी अशोक लोखंडे चोरीच्या तपासासाठी मंचर येथे दुर्गा श्वानाला घेऊन चालले होते.
पण कोथुर्णे येथील घटना अतिसंवेदनशील असल्यामुळे दोघे मोशीमार्गे कोथुर्णे येथे गेले. तेथे ‘दुर्गा’ने माग काढला. संशयिताचा वावर जास्त काळ असलेल्या ठिकाणी श्वान थांबले. त्यानंतर कामशेत पोलिसांनी तातडीने तपास केला. आरोपीला तातडीने अटक केली.

error: Content is protected !!