मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील अर्चना गंगाराम सगर देत आहे ज्ञानदानाचे धडे
प्रयत्न आणि सातत्या दोन गोष्टी जवळ असल्या तर अशक्य असे काहीच राहत नाही .मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील धामणदरा जिल्हा परिषद शाळेतील अर्चना गंगाराम सगर या २०१९ मध्ये लातूर जिल्ह्यांमधून पुणे जिल्ह्यामध्ये त्या अंतर जिल्हा बदली मध्ये रुजू झाल्या. नंतर मावळ तालुक्यातील त्यांना कुठल्याही भौगोलिक परिस्थितीचा आढावा नव्हता.
समुपदेशनामध्ये प्रथमतः जी. प. शाळा नेसावे निवडण्यात आली.तेथे उपशिक्षिकाचे पद अतिरिक्त असल्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये धामणदरा शाळेची त्यांची ऑर्डर कढण्यात आली. ती एक शिक्षकी शाळा असून अति दुर्गम भागात आहे. त्या प्रथम शाळेत गेल्यानंतर त्यांचे ध्येय होते पट वाढवणे, गुणवत्ता वाढवणे, गावातील विद्यार्थी इंग्लिश मीडियम लोणावळा मध्ये जात होते .
त्या पालकांच्या गृहभेटी घेऊन चर्चा केली असता त्या पालकांचा मराठी मिडीयम कडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नव्हता . पालकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम चालू केले माझी शाळा माझे उपक्रम, तारखेचा पाढा ,सुंदर हस्तक्षर, शनिवारी दप्तर विना शाळा, वनभोजन परिसर सहल , बाल आनंद मेळावा, विविध सण, राख्या बनवणे ,गणपती तयार करणे, भोंडला, प्रश्नमंजुषा, गॅदरिंग ,राष्ट्रीय सण ,उत्सव.इ. पालकांचा व गावकऱ्यांचा सहभाग वाढवून मराठी शाळा कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला व पट वाढवण्यास यश आले.
त्यांची शाळा ही डोंगरात भागात असल्यामुळे खूप पाऊस असतो. शाळेवरती छत असून सुद्धा तो छत गळायचा विद्यार्थी पाण्यात बसायचे त्यानी पालकांच्या मदतीने छतवरती फरशी बसवण्यात आले अनेक प्रयत्न करून सुद्धा पाऊस खूप असल्यामुळे छेत गळती होत होती त्यानी पंचायत समितीमध्ये बांधकाम विभाग बांधकाम विभागामध्ये छत गळतीचा प्रस्ताव सादर केला जिल्हा परिषद तर्फे अनुदान १ लाख रुपये जमा झाले.
अंदाजे खर्च होता १ लाख तीस हजार रुपये. त्यामुळे कोणतेही कॉन्टॅक्टर काम घेण्यास तयार नव्हते. प्रथम लोकसभाग मिळवण्याचा प्रथम प्रयत्न केला असफल ठरले विद्यार्थी पाण्यात बसत होते त्यामुळे दुरुस्ती करणे गरजेचे होते त्यासाठी विद्यार्थ्यांचा हित लक्षात घेऊन त्या लातूर वरून कॉन्टॅक्टर बोलवून स्वतः ३० हजार रुपये खर्च करून पत्रा शेड चे काम पूर्ण केले भौतिक सुविधा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करून रोटरी क्लब संस्थेतर्फे टॉयलेट बाथरूम, एक्वा फिल्टर वास बेसिन बसवण्यात आले.
निर्मिती फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य स्वेटर, सॅंडल ,बॅग गावातील सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना दोन-तीन वर्ष पुरेल इतके शैक्षणिक साहित्य त्या शाळेत आल्यापासून आतापर्यंत शाळेतील विद्यार्थी शाळेतील शैक्षणिक साहित्याचा वापर करतात लायन क्लब तर्फे, स्टडी विथ टेबल गावातील परणी दळवी सरांतर्फे माइक स्पीकर शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था त्यांच्या बंगल्यावरून उपलब्ध करून घेण्यात आले.
ग्रामपंचायतीतर्फे कपाट पाण्यासाठी हजार लिटरची टाकी गावातील उद्योजक गिता जयदीप गुप्ता मॅडम तर्फे पाच लाख ५० हजार रुपये लोकसभा मिळवून गेट, रंगरंगोटी ,खिडक्या ,किचन फर्निचर विथ टॉयलेट ,बाथरूम, आधुनिक स्वच्छतागृह फळ रंगवणे ,दार खिडक्या ,झाडे मुलांना खेळण्यासाठी साहित्य ,चित्रकला वही इ. केंद्र स्तरावरील क्रीडा स्पर्धेमध्ये लोकनृत्य ,वकृत्व स्पर्धा ,सहभाग घेऊन वकृत्व स्पर्धेमध्ये ,धावणे लांब उंच उडी, इत्यादी स्पर्धेमध्ये बीट स्तरापर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. असे अनेक प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी केले आहेत.
कार्बोरेट फाउंडेशन तर्फेKYN divace प्रोजेक्टर त्यामध्ये त्यामध्ये पहिली ते सातवी पर्यंत अभ्यासक्रम आहे. यावेळी अर्चना मॅडमनी सांगितले की शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्ण विद्यार्थी ,सुजान्य नागरिक घडवण्याचे काम मी करत आहे दुर्गम भागामध्ये काम करत असताना अनेक अडचणींना मात करावे लागते. त्या परिस्थितीला न डगमगता समोर जाण्याची जिद्द ध्येय असल्यानंतर अशक्य ही शक्य होते. ज्ञानदानाचे कार्य माझ्या हातून घडत आहे .
माझे सर्व विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण ,सुजन्य नागरिक घडतील व देशाची सेवा करतील यासाठी मी सतत प्रयत्न करीत राहीन .
०२/०१/२०२१ मध्ये मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे क्रांतीज्योती माता सावित्रीबाई गुणवंत शिक्षक पुरस्कार
०१/१०/२०२३ lion club तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार
१९/११/२०२३ महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद तर्फे राज्यस्तरीय प्रशासन रत्न नागरी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
- मराठी माध्यमांच्या शाळा स्मार्ट व डिजिटल बनवणे काळाची गरज – संतोष खांडगे
- सदाबहार गीतांनी दिला चिरतारुण्याचा प्रत्यय
- रविवार,०५ जानेवारीला तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन
- महर्षी कर्वे आश्रम शाळेचे सोळावे वार्षिक संमेलन उत्साहात संपन्न
- मावळात आज पासून किर्तन महोत्सव : आमदार सुनिल शेळके व विठ्ठल परिवाराचा पुढाकार