गावगाड्यातील हरहुन्नरी कार्यकर्ता हरपला
कांब्रे गावातील सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमी आग्रहाने सहभागी होणारं एक तरुण – तडपदार युवा नेतृत्व त्याचबरोबर मावळ,मुळशी, खेड, शिरूर मध्ये नातेसंबंधाच्या माध्यमातून एक दांडगा परिचय असणारा, अनेक राजकीय नेत्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी जवळीक असणारा एक लढवय्या युवक अगदी कमी वेळात आपल्या कुटुंबाला सोडून गेला.
  सुधीर भाऊं शिक्षणासाठी मामांकडे होते आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी कोणती नोकरी न करता आपल्या धाकटे बंधू राजेश यांच्या सहकार्याने संपूर्णपरिवारासह कुटुंबाचा असणारा शेती व्यवसाय आणि पोल्ट्री व्यवसाय करु लागले. शेती मध्ये आधुनिक आणि पारंपरिक पध्दतीने ते फरस बी, घेवडा,वांगी यांची उत्तम वाण आणून त्यामधून उत्तम प्रकारचे पीक घेत.
  आपला शेती व्यवसाय सांभाळत त्यांनी गावगाड्यात सामाजिक कार्यात सहभागी होऊन मोलाची भूमिका सांभाळत हनुमान मंदिर परिसरातील पहिलं काँक्रेटीकरण करून व अनेक ठिकाणी महत्वपूर्ण भूमिका घेऊन विकासकामात मोठा हातभार लावला हे केव्हाही विसरता येणार नाही.
  गावगाड्यात महत्वाची भूमिका पार पाडत असताना अनेक गोष्टींना प्राधान्य देत,आपल्या जिवलग सहकार्यांना  संधी उपलब्ध करून देत त्यांची पाठराखण तर केलीच पण त्यांना योग्य न्यायही मिळवून दिला. या त्यांच्या दिलदार स्वभावाने त्यांचे सहकारी हवालदिल झाले आहेत. जणू त्यांच्या पाठीशी असणारा हात नकळत निसटला गेल्याची भावना त्यांच्या कडून बोलली जात आहे.
   सामाजिक, राजकीय वा वयक्तिक विषयांत त्यांनी दाखवलेल्या भूमिकेमध्ये समोर कितीही तोला-मोलाची व्यक्ती असो तो जर चूक असेल तर त्याला समोरासमोर फैलावर घेऊन त्याची चूक दाखवून देणारा त्यांचा स्पष्ट स्वभाव होता.एक सच्चा माणूस असा अचानक नाहीसा झाल्याने सर्वचजण अचंबित झाले आहेत.
   सुधीर आलम यांची ओळख सुधीरभाऊ या नावाने परिचीत होती. सुधीरभाऊ च्या अशा अकस्मित जाण्याने त्यांचे बंधू राजेश आलम, वडील रामचंद्र आलम, बहीण,आई, पत्नी, मुलगा, मुलगी, पुतणे, पुतणी त्याच बरोबर त्यांच्या सुख-दुःखात सहभागी असणारे,पाहुणे, आप्तेष्ट,जिवलग मित्र परिवार यांना अतोनात दुःख झालं आहे.
    अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे थोडासा कानाडोळा झालेला हा तरुण ऐन तारुण्यात मुला-मुलींची आधारसावली,आपल्या अर्धांगिनी ची साथ सोडून गेल्याने सर्वत्र हळ-हळ व्यक्त होत आहे.
      ग्रुप ग्रामपंचायत डाहुली अंतर्गत गावातील अनेक समस्यांना चं निरसन करून आपल्या सहकार्यांना मार्गदर्शन व सूचना करणारा बोरीवली आणि कांब्रे या गावातील जनसामान्यांच्या सुख-दुःखात कायम पुढाकार घेणारं सुधीरभाऊ सारखं नेतृत्व होईल असं वाटतं नाही.
     “झाले बहुत, होतील बहुत, परंतु तुझ्या सारखा पुन्हा होणे नाही”
   त्यांच्याबद्दल ही वाक्य रचना करणाच्या त्यांच्या सहकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा भरून आलेल्या त्यांनी कितीही लपवल्या तरी त्या अगदी स्पष्टपणे जाणवतात.
या महत्वकांक्षी, लोकाभिमुख तरुण सहकार्याला स्वर्गीय सुधीरभाऊ ला आमची भावपूर्ण श्रद्धांजली.

error: Content is protected !!