मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मुंबई डबेवाल्यांचा धडा
मुंबई:
मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मुंबईच्या डबेवाल्यांचा धडा गिरवला जाणार आहे.जागतिक पातळीवर मुंबई विद्यापीठ  नावाजलेले आहे. अग्रगण्य अशी या महाविद्यालयाची ओळख आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने “Mapping of Mumbai ” ( मॅपिंग ऑफ मुंबई ) या नावाने खंड प्रकाशित झाला
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नामवंत लेखकांचे  या खंडात आपले लेख समाविष्ट केले आहेत. मुंबईचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला आणि वारसा या विषयीच्या लेखन आणि संशोधन या खंडात आहे. “Knowledge Resource Centre ” अंतर्गत *”The Mapping Of Mumbai ” या खंडात राज्य दुष्काळ निवारण समितीचे  सदस्य, मुंबई डबेवाले संघटनेचे प्रवक्ते, वारकरी प्रबोधन समितीचे मलबार हिल तालुका अध्यक्ष, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे सदस्य आणि आंबोली गावचे माजी उपसरपंच, विष्णू दत्तात्रय काळडोके यांनी या डबेवाल्यांचा धडा लिहिला आहे. आजपर्यंत अनेक परदेशी महाविद्यालयात मुंबईच्या डबेवाल्यांचे वितरण धोरण, अचूक वेळेचे नियोजन आणि  अफाट व्यवस्थापन यावर लिहिले गेले आहे. मॅनेजमेंट गुरु म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांच्या कार्यपद्धतीचा अवलंब होत आहे.
  होवोर्ड, मिशीगन, बोस्टन सारख्या  आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित विद्यापिठातून केला जात होता. व्यवस्थापन (Management ) विषयावर डबेवाल्यांचा आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा समावेश अनेक विदेशी महाविद्यालयातील अभ्यासक्रमात केला गेला होता. देश पातळीवर हवी तशी दखल घेतली जात नसल्याच शल्य विष्णू काळडोके यांच्या मनाला सतत बोचत होती.
   आणि ती संधी मुंबई विद्यापिठाचे अधिष्ठाता  डॉ. राजेश खरात  यांनी प्रबंध देण्याची परवानगी दिली. त्या संधीचे सोनं करत जागतिक स्तरावर हा खंड प्रकाशित होणे ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे असे काळडोके म्हणाले.
    मुंबई विद्यापीठासह असंख्य देशांतर्गत आणि विदेशी महाविद्यालयात आपल्या व्यवस्थापनाचे धडे गिरविले जाणार याचा अभिमान एक आणि प्रत्येक डबेवाला कामगाराला आहे.
    काळडोके म्हणाले,” आपल्यातील गुणवत्ता आणि प्रतिभासंपन्नता, विवेकबुद्धी आणि प्रगल्भता याचा समाज हितासाठी वापर करता आला. ही बाब मनाला सुखावणारी आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहावेत हीच प्रांजळ प्रार्थना.
   

error: Content is protected !!