पाॅलीटेक्निक क्रीडा स्पर्धेत पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकचे नेत्रदीपक यश
प्रतिनिधी श्रावणी कामत
पिंपरी:
महाराष्ट्र राज्य इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने विभागीय पातळीवर एकूण १६ झोन मध्ये आणि राज्य पातळीवर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
त्यापैकी डी -१ झोनच्या स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीबी) मधील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सांघिक गटात नेत्रदीपक यश मिळवले.
यामध्ये सांघिक खेळात मुलांच्या गटाने फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम या खेळांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. तर बास्केटबॉल, हॉलीबॉल आणि बुद्धिबळ यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. सांघिक खेळात मुलींनी कबड्डीमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.
ॲथलेटिक्स मध्ये मुलांनी १००, २००, ४००, ८०० मीटर मध्ये आणि तिहेरी उडी, लांब उडी, थाळीफेक यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. मुलींनी कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
मुलींनी ॲथलेटिक्स मध्ये १०० मीटर, ४०० मीटर आणि गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांक मिळवलेल्या संघाची आणि खेळाडूंची मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. विजेत्या खेळाडूंचे आणि क्रीडा प्रमुख एस. एस. कदेरे, प्राचार्य व्ही. एस. बॅकोड यांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर,खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केल्याने पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष