कार्ला सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब  भानुसघरे 
उपाध्यक्षपदी दत्तात्रय हुलावळे
कार्ला :
विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिलाटणे
येथील ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब शिवाजी भानुसघरे  तर व्हाईस चेअरमनपदी कार्ला येथील दत्तात्रय गोंविद हुलावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी चेअरमन प्रशांत हुलावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने वडगाव येथील निबंधक कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम ए कुलकर्णी  यांनी  तर सोसायटीचे सचिव सचिन भानुसघरे यांनी काम पाहिले. 
कार्ला सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक देखील सर्वपक्षीय नेत्यांच्या सहकार्यान बिनविरोध करण्यात आली.
यावेळी सोसायटीचे  संचालक  किरण हुलावळे, भाऊसाहेब मावकर,प्रशांत हुलावळे , दत्तात्रेय पडवळ, राजू देवकर, पांडुरंग भानुसघरे, रामचंद्र येवले, किसन आहिरे, सायली बोत्रे, रंजना गायकवाड यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!