
निगडे शाळेत सीसीटीव्हीची सुरक्षा
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील निगडेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सीसीटीव्हीच्या सुरक्षिततेचे कवच मिळाले आहे. सीसीटीव्ही उद्घाटन समारंभ सरपंच भिकाजी भागवत यांच्या हस्ते झाला.
वडगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार देशमुख व शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सरपंच भिकाजी भागवत,उपसरपंच गणेश भांगरे,पोलीस पाटील संतोष भागवत,उद्योजक मारुती भांगरे,युवा नेते योगेश थरकुडे पुढाकारातून व ग्रीन कास्ट वॉलिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. या सरपंच भिकाजी भागवत म्हणाले ,”सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे संपूर्ण शाळा तसेच निगडे गावातील सर्वाधिक महत्त्वाचा असणारा चौक (बस स्टॉप) सीसीटीव्हीच्या नजरेत असणार आहे.
निगडे गावचा विकास होत असताना गावची सुरक्षा ही तितकीच महत्त्वाचे आहे,असे ही भागवत म्हणाले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ भांगरे ,माजी अध्यक्ष संतोष भांगरे,साहेबराव भांगरे,साहेबराव देशमुख,वैशाली जागेश्वर,योगेश थरकुडे, मारुती भांगरे ,जालिंदर थरकुडे, रवी थरकुडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिनाथ शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी भगत,निशा मुंडे यांनी परिश्रम घेतले.
- ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा : सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड
- गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू
- बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यायेण्यासाठी बसेसची मोफत सेवा सुरू
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा,उपक्रमाचे नववे वर्ष : आमदार सुनिल शेळके यांचा पुढाकार




