पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठानचा हळदी-कुंकू समारंभ आदिवासी पाड्यावर उत्साहात संपन्न झाला.संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने दरवर्षी आदिवासी पाड्यावर,अंध अपंग, मुकबधीर,दिव्यांगाना विविध प्रकारची मदत केली जात असते.
  हळदी-कुंकू समारंभाचे औचित्य साधुन रायगड जिल्हा खालापूर तालुक्यातील बीड खुर्द येथील आदिवासी पाड्यावर हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले.या समारंभात ७० महिला सहभागी झाल्या होत्या.या महिलांना संक्रांतीचे वाण म्हणून एक नवीन साडी आणि एक किलो साखर  देण्यात आली.
   अलका पवार म्हणाली,” माझ्यावर माझ्या जमातबांधवांवर आतापर्यंत बरीच संकट आली. पण आमच्या घरापर्यंत कोणीही मदतीला धाऊन आले नाही. आजपर्यंत हळदी-कुंकू कसले आणि दिवाळी असे कोणतेच सण आम्ही थाटामाटात करीत नाही.
   आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करतो. मोलमजुरी करुन पोट भरतो.
    कमल कातकरी म्हणाल्या,”  आम्ही विटभट्टीवर काम करणाऱ्या महिला. आम्हाला कधी कोणताही सण माहित नसतो .आज संस्कार प्रतिष्ठाननी आमच्या येथे येऊन प्रथम आमच्या महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम घेतला याचा आम्हाला आनंद झाला.
    आमच्या महिला दोन दिवस विचारत होत्या कसला कार्यक्रम आहे. आमच्या महिलांनी आज मोलमजुरी करण्यासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आणि खरोखरच आजचा दिवस आम्हाला आमचा आनंद द्विगुणीत करणारा ठरला.संस्कार प्रतिष्ठाननी आम्हाला काय दिले यापेक्षा आमच्या गोरगरिबांत येऊन कार्यक्रम केल्याचा आनंद झाला.
याचे संयोजन न नियोजन दोन दिवसात झाले.
खोपोली येथील आदिवासी बांधव संतोष मेंगाळ यांनी यासाठी सहकार्य केले.या पाड्याचे सरपंच भाऊ पवार यांनी आभार मानले.या कार्यक्रमाचे उद्घाटन खोपोलीचे नगरसेवक  किशोर पानसरे यांच्याहस्ते झाले.
त्यांनी संस्कार प्रतिष्ठानच्या कार्यांचे कौतुक केले.संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक /अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आनंद पाथरे ,कैलास मोरे, संचालिका प्रिया पुजारी ,स्वाती म्हेत्रे, मनिषा आगम, सुनिता गायकवाड, मोहिनी सुर्यंवंशी, गायत्री माळी, सायली सुर्वे ,संध्या स्वामी यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!