
इंदोरी:
प. पु. सद्गुरु श्री गगनगिरी महाराज यांच्या पिंपरणे संगमनेर ते खोपोली पालखी सोहळ्याचे चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE) येथे आनंदात व उत्साहात स्वागत करण्यात आले.
पालखीचे स्वागत ढोलताशा आणि लेझीमच्या गजरात करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने औक्षण करून पुष्पवृष्टी करण्यात आली.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी तीन वेगवेगळे नृत्याविष्कार सादर केले.दिंडीतील भक्तांनी हरिपाठ केला आणि महाराजांची आरती घेण्यात आली.
समस्त इंदुरीकर, विद्यार्थी वर्ग आणि पालक मोठ्या संख्येने या आनंद सोहळ्या सहभागी झाले.आणि सर्वांनी महाराजांचा आशीर्वाद घेतला. महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
- कर्तृत्वाने मोठे होऊन चांगले वागा: देशमुख महाराज
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगावात टँकरने मोफत पाणी पुरवठा
- शनिवारी वडगावमध्ये पोटोबा महाराजांचा उत्सव
- रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर कामशेत येथे संपन्न : रामदास आठवले यांनी केले मार्गदर्शन
- राज्यस्तरीय मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत पैसाफंड शाळेचे यश




