तळेगाव दाभाडे:
मावळ तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे ,भाजपा बुथ अध्यक्ष, सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख यांना अयोध्या दर्शन घडविणार असल्याचे भाजपाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय गुंड यांनी सांगितले.
येथे भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा मतदार संघातील प्रवासी कार्यकर्त्यांची कार्यशाळा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली.यावेळी झालेल्या बैठकीत गुंड बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू आहे. येणाऱ्या काळात भारत देश मोदी साहेबांच्या नेतृत्वात विश्र्वगुरू म्हणून जागतिक पातळीवर सिद्ध होत आहे.
या ऐतिहासिक कार्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्व सुपर वॉरियर्स, सर्व प्रवासी कार्यकर्ते, सर्व ग्रामसंयोजक यांनी जोमाने कार्याला लागावे अशा सूचना कार्यशाळेत देण्यात आल्या.
मावळ तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे डाॅक्टर, प्रमुख किर्तनकार,वकील तसेच भाजपा बुथ अध्यक्ष, सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख यांना आयोध्या दर्शन करवनार आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष भाजपा मावळ दत्ताभाऊ गुंड यांनी दिली
यावेळी कोंडीवडे अमा ग्रामपंचायत चे उपसरपंच अरुण तळावडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष मा.शरद भाऊ बुट्टे पाटील त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
जेष्ठ नेते निवृत्ती शेटे, मा.एकनाथराव टिळे, श्रीधर पुजारी, जेष्ठ नेते प्रशांत ढोरे,रविंद्र दाभाडे, शिवाजी टाकवे, अरुण भेगडे पाटील, डॉ.ताराचंद कराळे,संजय रौंधळ,बाळासाहेब घोटकुले, संदीप सातव,राजू मुर्हे ,एकनाथ पोटफोडे, अभिमान्यू शिंदे, अविनाश गराडे, सचिन येवले, रोहिदास असवले, अशोक दाभाडे, अरुण लाड, लहू शेलार ,जितेंद्र बोत्रे,नितीन मराठे, सायली बोत्रे ,अनंता कुडे, अभिजीत नाटक,सूर्यकांत सोरटे, ज्ञानेश्वर आडकर,शरद साळुंखे, दत्ता खेंगले, प्रणेश नेवाळे यांच्यासह सर्व सुपर वॉरियर्स, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, सर्व प्रवासी कार्यकर्ते, सर्व ग्राम संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे