तळेगाव दाभाडे:
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली.
बापूसाहेब भेगडे यांना मानणारा मोठा वर्ग मावळ तालुक्यात आहे.तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशी त्यांची राजकीय वाटचाल राहीली आहे.ते विविध सामाजिक संस्थांशी निगडित आहे.मावळ विधानसभेची निवडणूक त्यांनी यापूर्वी लढवली होती.प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
- चैतन्य इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई शाळा महाराष्ट्र स्कूल मेरिट पुरस्काराने सन्मानित
- बापूसाहेब भेगडे यांनी महामंडळ नाकारले: विधानसभेच्या उमेदवारीची मागणी
- रेल्वे प्रवासात हरवलेले दागिने आणि महत्वाची कागदपत्रे मिळाली परत
- अरुण गराडे साहित्य प्रतिभा पुरस्काराने सन्मानित
- गीता कधीही कालबाह्य होत नाहीचिन्मय मिशन आंतरशालेय गीता पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद