वडगाव मावळ :
महिंद्रा ऍक्सेलो कंपनीच्या मदतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुकर झाली.कान्हे परिसरात असणाऱ्या पाच गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सहावी – सातवीतील १०० विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.
आमदार  सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून, जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा कान्हे याठिकाणी, महिंद्रा ऍक्सेलो कंपनीच्या माध्यमातून कान्हे, साते, जांभूळ, नायगाव आणि ब्राम्हणवाडी या शाळेतील  विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले.
शालेय गरीब, होतकरू विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासात गोडी वाढावी यासाठी व शाळेपासून दूरवर राहणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची रोजची पायपीट सुकर व्हावी यासाठी महिंद्रा कंपनीने फार मोलाचे काम केलेले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी, महिंद्रा ऍक्सेलो कंपनीच्या वतीने, कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट मा. दिवाकर श्रीवास्तव साहेब, आपल्या इतर अधिकारी वर्गासमवेत  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कान्हे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच  विजय सातकर,माजी  उपसरपंच संदीप ओव्हाळ, ग्रामपंचायत सदस्य, बाबाजी चोपडे, अंकुश चोपडे, कोंडीबा सातकर, वीरकर यांसह नायगावच्या उपाध्यक्ष काजल वावरे., साते शाळेचे अध्यक्ष  दत्तात्रय आगळमे, माजी अध्यक्ष वंदना आगळमे तसेच जांभूळ गावचे सरपंच नागेश.ओव्हाळ व उपसरपंच एकनाथ गाडे,पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसमवेत बहुसंख्येने उपस्थित होते.
महिंद्रा कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत कान्हे शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर यांनी सर्व सदस्यांच्या समवेत केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक  जिजाराम काळडोके यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब खरात यांनी केले. आलेल्या सर्व अधिकारी, पदाधिकारी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार कान्हे शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल ढोरे मॅडम  मानले.

error: Content is protected !!