लोणावळा:
व्ही.पी.एस इंग्लिश टिचींग स्कूल,लोणावळा मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात झाले. उपप्राचार्य दहिफळे सर आणि क्रीडा विभाग प्रमुख रेवती बोके प्रमुख पाहुणे होते. मुख्याध्यापिका भारती लोखंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
५जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत शाळेत विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रसंगी बोलताना दहिफळे  यांनी खेळ व व्यायाम यांच्याबरोबर सकस आहार याचे महत्व विषद केले.रेवती बोके यांनी खेळाद्वारे विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक विकास होत असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापिका लोखंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रीडा विभाग प्रमुख अंकुश वाघुलकर यांच्या नियोजनानुसार पुढील आठ दिवसात ह्या क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत.या  उद्घाटन प्रसंगी  व्हर्जिनिया रॉइझ यांनी इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी बसवलेले मानवी मनोरे दाखविले.
बाळासाहेब खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बसवलेले मार्च पास्ट चे सादरीकरण करण्यात आले. वाघुलकर यांनी खेळाचे नियम अटी यांची विद्यार्थ्यांना शपथ दिली सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे ,कार्यवाह डॉ.सतीश गवळी ,सहकार्यवाह विजय भुरके ,शाळा समिती अध्यक्ष कन्हैया भुरट यांनी क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापिका लोखंडे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले.सूत्रसंचालन अनिकेत रासकर व आभार प्रदर्शन मंजूषा महापुरे यांनी केले.

error: Content is protected !!